Jai Bhim Kranticha Nara lyrics

Jai Bhim Kranticha Nara  


The Song by Anand Shinde, Adarsh Shinde, Composed by Utkarsh, lyrics by Amol Kadam and Utkarsh Shinde


Lyrics: Jai Bhim Kranticha Nara Ha (जयभीम क्रांतीचा नारा हा)



Jai Bhim Kranticha Nara

उठ आवाज कर, भीम प्रहार कर
इतिहास कर नवा
वैऱ्यास धाक दे ऐसी हाक दे
दाखव जोश नवा ।। २।।
ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशा ही
जयघोष नवा घुमू दे दाही दिशा ही,
जयभीम क्रांतीचा नारा हा
जयभीम आमचा किनारा हा
जयभीम बोले दरारा हा, वैऱ्या इशारा हा ।। धृ ।।
जयभीम जय भीम ….
चळवळ प्रबळ कर हा बदल वाघाची चाल घे
दाखव जिगर भय हे जुगार विद्येची ढाल घे
कर हा उठाव घालुनी घाव हाती मशाल घे
जग जिंकूनि उठ पेटुनी मिठीत आभाळ घे
लढा आता छातीचा कोट करुनि
तो छावा येउदे झेप घेऊनि
जयभीम क्रांतीचा नारा हा
जयभीम आमचा किनारा हा
जयभीम बोले दरारा हा, वैऱ्या इशारा हा ।। १ ।।
जयभीम जय भीम ….
पाऊल उचल होशील सफल किती सोसल्या कळा
निर्धार कर हा वार कर घे हाती हा निळा
इतिहास नवा करतो कथन शिलवंत आजवर
जयभीम ने केली आता इथे आमची ही मान वर
दिवसअसे उगवले उत्कर्षचे
पर्व नवी पहिले आदर्शाचे
जयभीम क्रांतीचा नारा हा
जयभीम आमचा किनारा हा
जयभीम बोले दरारा हा, वैऱ्या इशारा हा ।। २ ।।


Comments