Babasaheb Zindabaad Lyrics
Babasaheb
Zindabaad
The Song by Adarsh Shinde, Composed by Utkarsh -Adarsh, lyrics by
Amol Kadam
कीर्तिवंत तू, जगी दिव्य
प्रभरत्न
सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा
आसमंति घुमे हा निनाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद ।।धृ।।
शेतकरी कामगार
दिनदुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रुढीच्या गाठी
नदी जोड़ प्रकल्प तुझा पाण्याच्या नियोजना साठी
रुपयाच्या प्रश्नांचे सारे उत्तर तुझ्याच हाती
नव्या दिशेचा आधुनिक भारत
तोच आंबेडकर वाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद ….।।१।।
सत्याग्रही,दर्जेदार, भाषण हे तुझ्याच
ओठी
संपविण्या जातिवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
प्रेम बंधुभाव सदा बुद्धाशी जोडतो नाती
मानवतेसाठी लढा शिकविते संघर्ष ख्याती
ओढतो अविरत,प्रगतीचा हा रथ
बुध्दीशी साधून संवाद..
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद …. ।।२।।
Comments
Post a Comment