झेंडा आमुचा प्रिया देशाचा Lyrics


Zenda Amucha Priya Deshacha, 

Marathi Desh Bhakti geet 

zenda amucha priya deshacha lyrics

झेंडा आमुचा प्रिया देशाचा Lyrics – Indian patriotic songs

झेंडा आमुचा प्रिया देशाचा

फडकत वरी महान

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम

लढले गांधी याच्याकरिता

टिळक, नेहरू लढली जनता

समरधूरंधर वीर खरोखर

अर्पुनि गेले प्राण

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम

भारतमाता आमुची माता

आम्ही गातो या जयगीता

हिमालयाच्या उंच शिरावर

फडकत राही निशाण

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम

या देशाची पवित्र माती

जूळती आमुच्या मधली नाती

एक नाद गर्जतो भारता

तुझा आम्हा अभिमान

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम

गगनावरी आणि सागरतिरि

सळसळ करिती लाटा लहरी

जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम

 click


Comments